करोना हा आजार कि मानसिक विकार?
करोना हा आजार कि मानसिक विकार? टेलिव्हिजन वर करोना,व्रूत्रपत्रात करोना, फोन लावताच करोना, चर्चेचा विषय करोनाच! सध्या च्या काळात २०२० ते २०२१ ही दोन्ही वर्ष वारेच्या वेगाने संपताना आपण पहिली आणि पाहत आहोत. बारकाईने पाहिल्यास या काळातील विविध क्षेत्रात झालेला अमुलाग्र बदल मग तो शिक्षण क्षेत्रातला असेल,उद्योगधंदे,शेती,दळणवळण,आरोग्य व्यवस्था असेल तसेच राजकीय,सामाजिक,आर्थिक,क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्र असेल,खरं बोलायचं तर झालेला बदल हा खरंच ऐतिहासिक आहे.ह्या संसर्गजन्य रोगाचे धडे येणाऱ्या पिढ्यांना अभ्यासक्रमात असतील असं वाटतं,आणि वाटायला का नको बर, या आजाराने आपल्याला भरपूर काही शिकवले.परंतु नीट पाहिल्यास मला वैयक्तिकरीत्या जाणवलं आपण आपल्याला फसवत तर नाही आहोत ना! तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल,अरे,'बाबा अभय का असे म्हणतोय!', आणि तेच माझे म्हणणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी करतोय.मी काही मानतज्ञ नाही किंवा...