माझ्या मते "स्वातंत्र्य" म्हणजे नक्की काय तर,
"७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा." "स्वतःचे योग्य विचार स्वतःच अमलात आणणे, म्हणजे स्वातंत्र्य" हि मी तयार केलेली व्याख्या. हि कितपत चूक किंवा बरोबर याचा निर्णय सर्वस्वी तुमचा. परंतु, उद्देश इतकाच की, आजच्या धकाधकीच्या जीवनात, खरं स्वातंत्र्य मी तरी गमावले आहे. कदाचित, इतरांच्या बाबतीत हे प्रकर्षाने जाणवत असलं, तरी तो त्यांचा व्यक्ती-स्वातंत्र्याचा भाग आहे, या कारणाने मी हस्तक्षेप करणं टाळतो. खरे स्वातंत्र्य जर अनुभवायचे असेल तर, जेव्हा आपण एकटे असू, तेव्हा आपल्या सदसदविवेकबुद्धीने विचार करून त्याची अंमलबजावणी करणे . समूहात मिळालेले स्वांतत्र्य, हे एका बिनधास्त व्यक्तीमत्वालाच अमलात आणता येते आणि सामान्य माणूस मात्र समोरच्या व्यक्तींमध्ये स्वतःचा शोध घेत, आपल्या मनावर अन्याय करत जगत असतो. स्वतंत्र राहायचं म्हटलं तर मात्र काही नियम हे येतातच ते म्हणजे, 'स्वतःचा कितपत विचार करावा? एखादी गोष्ट करायची ठरवली, तर त्याचे परिणाम, नफा, तोटा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितपत समाधान' ह्या गोष्टींचा आपण बारका...