Posts

माझ्या मते "स्वातंत्र्य" म्हणजे नक्की काय तर,

Image
 "७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा."     "स्वतःचे योग्य विचार स्वतःच अमलात आणणे, म्हणजे स्वातंत्र्य" हि मी तयार केलेली व्याख्या. हि कितपत चूक किंवा बरोबर याचा निर्णय सर्वस्वी तुमचा. परंतु, उद्देश इतकाच की, आजच्या धकाधकीच्या जीवनात, खरं स्वातंत्र्य मी तरी गमावले आहे. कदाचित, इतरांच्या बाबतीत हे प्रकर्षाने जाणवत असलं, तरी तो त्यांचा व्यक्ती-स्वातंत्र्याचा भाग आहे, या कारणाने मी हस्तक्षेप करणं टाळतो.      खरे स्वातंत्र्य जर अनुभवायचे असेल तर, जेव्हा आपण एकटे असू, तेव्हा आपल्या सदसदविवेकबुद्धीने विचार करून त्याची अंमलबजावणी करणे . समूहात मिळालेले स्वांतत्र्य, हे एका बिनधास्त व्यक्तीमत्वालाच अमलात आणता येते आणि सामान्य माणूस मात्र समोरच्या व्यक्तींमध्ये स्वतःचा शोध घेत, आपल्या मनावर अन्याय करत जगत असतो.      स्वतंत्र राहायचं म्हटलं तर मात्र काही नियम हे येतातच ते म्हणजे, 'स्वतःचा कितपत विचार करावा? एखादी गोष्ट करायची ठरवली, तर त्याचे परिणाम, नफा, तोटा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितपत समाधान' ह्या गोष्टींचा आपण बारका...

करोना हा आजार कि मानसिक विकार?

Image
  करोना हा आजार कि मानसिक विकार?            टेलिव्हिजन वर करोना,व्रूत्रपत्रात करोना,            फोन लावताच करोना, चर्चेचा विषय करोनाच!         सध्या च्या काळात २०२०  ते २०२१ ही दोन्ही वर्ष वारेच्या वेगाने संपताना आपण पहिली आणि पाहत आहोत. बारकाईने पाहिल्यास या काळातील विविध क्षेत्रात झालेला अमुलाग्र बदल मग तो शिक्षण क्षेत्रातला असेल,उद्योगधंदे,शेती,दळणवळण,आरोग्य व्यवस्था असेल तसेच राजकीय,सामाजिक,आर्थिक,क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्र असेल,खरं बोलायचं तर झालेला बदल हा खरंच ऐतिहासिक आहे.ह्या संसर्गजन्य रोगाचे धडे येणाऱ्या पिढ्यांना अभ्यासक्रमात असतील असं वाटतं,आणि वाटायला का नको बर, या आजाराने आपल्याला भरपूर काही शिकवले.परंतु नीट  पाहिल्यास मला वैयक्तिकरीत्या जाणवलं आपण आपल्याला फसवत तर नाही आहोत ना!            तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल,अरे,'बाबा अभय का असे म्हणतोय!', आणि तेच माझे म्हणणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी करतोय.मी काही मानतज्ञ नाही किंवा...

"माणसातला पाऊस"

Image
PC-ABHAY_AKA_UAB.  माणसातला पाऊस,म्हणजे नेमक काय ? सोप्या भाषेत सांगयच  झाल,तर माणसाच्या  मानात असंख्य     विचार पावसाच्या थेबांन  प्रमाणे सतत बरसत असतात आणि नक्की कुठे आणि कसे एकत्र व्हायच ,एकाघ्र  व्हायच हे मात्र  त्याला  त्यावेळी माहीत नस्ते ,मिळणाऱ्या प्रवाहाच्या दिशेने तो वाहत असतो .एका डबक्यातुन तलावत,तलावतुन नदीत,नदीतून खाड़ीत,आणि शेवटी तो महासागरत मिसळून जातो, त्याची ओळख हळू हळू कमी होऊन मर्यादित होते. पावसाचे असंख्य थेबांत आपण ही एक थेंब आहोत असे माला वाटते, फ़क्त फरक एवढाच की,पावसाच्या थेबाला आपण कुठल्या प्रहवात  पडणार याचा अंदाज नसतो. माणसाला मात्र त्याचा अंदाज हाआधीच असतो.म्हणून माणसाने आयुष्यात योग्य तो प्रवाह निवडवा,ज्या प्रवाहातून आपली वेगळी ओळख निर्माण होईल.जो प्रवाह आपल्याला वादळातही संथपणे वाहट नेईल,योग्य तो मार्ग दाखवेल,असा प्रवाह निवडावा . उद्देश्य एवढाच की आपला मार्ग निवडतना तो चांगला का वाईट ह्याची दूरदृष्टि असावी .कुठल्याही प्रवाहात वाहून जाऊ नये  .आपल्या अवयवांचा वापर ...