करोना हा आजार कि मानसिक विकार?

  करोना हा आजार कि मानसिक विकार? 



          टेलिव्हिजन वर करोना,व्रूत्रपत्रात करोना,

           फोन लावताच करोना, चर्चेचा विषय करोनाच!



        सध्या च्या काळात २०२०  ते २०२१ ही दोन्ही वर्ष वारेच्या वेगाने संपताना आपण पहिली आणि पाहत आहोत. बारकाईने पाहिल्यास या काळातील विविध क्षेत्रात झालेला अमुलाग्र बदल मग तो शिक्षण क्षेत्रातला असेल,उद्योगधंदे,शेती,दळणवळण,आरोग्य व्यवस्था असेल तसेच राजकीय,सामाजिक,आर्थिक,क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्र असेल,खरं बोलायचं तर झालेला बदल हा खरंच ऐतिहासिक आहे.ह्या संसर्गजन्य रोगाचे धडे येणाऱ्या पिढ्यांना अभ्यासक्रमात असतील असं वाटतं,आणि वाटायला का नको बर, या आजाराने आपल्याला भरपूर काही शिकवले.परंतु नीट  पाहिल्यास मला वैयक्तिकरीत्या जाणवलं आपण आपल्याला फसवत तर नाही आहोत ना!

           तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल,अरे,'बाबा अभय का असे म्हणतोय!', आणि तेच माझे म्हणणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी करतोय.मी काही मानतज्ञ नाही किंवा डॉक्टर ही नाही, तरीही मला असे वाटते की जी परिस्थिती या संसर्गजन्य आजाराने निर्माण केली आहे त्याहून जास्त या परिस्थितीला कारणीभूत आपल्याला माहितीचा पुरवठा करणारे स्वतंत्र सामाजिक माध्यमे(सोशल मीडिया), ही कारणीभूत आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे."करोना", या संसर्गजन्य आजाराला व त्याच्या नावाला जणूकाही एवढे मोठे केले आहे की जगातील प्रत्येक माणूस हा प्रत्येक मिनिटाला बोलला जरी! तरी करोनाला अनुसरूनच.

          आधुनिकीकरण आणि सामाजिक माध्यमे(सोशल मीडिया) यांच्यामार्फत हा रोग वा याचे दुष्परिणाम अशाप्रकारे लोकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न होत आहे की जेणेकरून लोक 24 तास ह्या रोगाच्या विचारात आणि या रोगाला घाबरून रहातील. मग ते आत्ता हातात असलेला मोबाईल फोन असो व जवळच्या व्यक्तीला कॉल केला असता ऐकू येणारी रिंगटोन असो, टीव्हीवरचे,मोबाईल ची जाहिरात असो किंवा प्रवास करताना ऐकू येणारी अनाउन्समेंट सिस्टीम असो,सगळीकडे सतत करोना आणि फक्त करोनाच! तुम्ही म्हणाल हा देखील करोना हा विषय धरून त्यावर भाष्य करतोय पण तसं नसुन मी तुम्हाला वैयक्तिक मत मांडत आहे व माझ्या दृष्टीकोनातून जागृत करत आहे!

          माहितीचा अधिकार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे परंतु ही माध्यमे याचा गैरवापर करताना दिसतात,अनावश्यक व सतत एकच बातमी ऐकून,संबंधित माणसाच्या विचारात ती बातमी घर करून बसत आहे व सतत ऐकल्यामुळे आपण इतर विचार सोडून संबंधित विषयावर बोलू लागतो त्यामुळे आपले वैयक्तिक जीवन बाजूला राहून आपण तो विषय धरून दैनंदिन कामाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष करत आहे,असे मला वैयक्तिकरित्या जाणवले,याचा परिणाम संबंधित व्यक्तीचा मनावर आणि विचार करण्याचा क्षमतेवर थेट होतो परिणामी तो घाबरातो,खचतो.

          'करोना' आजार भयानक असेल ही आणि याची माहिती प्रत्येक माणसापर्यंत पोहचवली गेली पाहिजे, हे मी मान्य करतो व ते झालंच पाहिजे! परंतु स्वतंत्र सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया)पूर्णपणे याचा गैरवापर करताना दिसते हे कुठेतरी थांबवल गेला पाहिजे.माणूस जसा विचार करेल तसा त्यांच्यात बदल होत जातो असे मला तरी वाटत! सध्याची परिस्थिती लोकांमध्ये सततच्या सोशल मीडिया चा वावर असल्यामुळे करोनाची तीव्रता ही जेवढी शरीरावर घातक आहे तितकीच सोशल मीडियामुळे ती मनावर घातक ठरत आहे.वेगवेगळ्या जाहिरात व माहितीचा पुरवठा करणारे करणारे काही स्वयंघोषितडॉक्टर त्यांचे वेगवेगळे सल्ले,खोट्या बातम्या यामुळे माणूस कुठेतरी या माध्यमांमुळे फसला जातोय. याची जबाबदारी कोण घेणार? म्हणून कुठेतरी आपण पण याचा विचार केला पाहिजे!

          आजार लाखो प्रकारचे आहेत,गंभीर स्वरूपाचे आणि सर्वसाधारण आजार ही आहेत पण आजारी असताना किंवा सामान्य जीवन जगत असताना आपण शरीराची जेवढी काळजी करतो तेवढच आपण मनाने खंबीर आणि निडर असलो तर संबंधित आजार बरा करण्याची ताकद द्विगुणित होते.मनाने खंबीर असलेली व्यक्ती कधीच परिस्थितीला सामोरे जाण्यास घाबरत नसते व स्वतःवर विश्वास ठेवून कायम सत्याचा मार्ग निवडते (Positive Thinking).

          माझी स्वतंत्रमध्यमांना(सोशल मीडिया) व जाहिरातदारांना एकच विनंती आहे की,आपण माणसाच्या आरोग्याचा जेवढा विचार करता तेवढा विचार माणसाच्या मानसीकतेवर ही करावा. यासाठी आपण "मानसशास्त्र तज्ञ" यांची जरूर मदत घ्यावी.माणसाच्या मनावर होणारे परिणाम हे शारीरिक आजारांपेक्षा किती घातक आहे याची तीव्रता आपल्याला नक्की अशा तज्ञांकडून समजून घेता येईल आणि आपण यावर नक्की विचार कराल अशी अपेक्षा करतो.


                                                                             - अभय आ. पवार.

                                                              


Comments

  1. True thinking about Covid.keep writing...

    ReplyDelete
  2. Reality of situation ,amazing view point that is put forward by you .its all many things happening around about covid but the one thing that we can do is to keep a distance from news & social media & maintain the positivity in this tough situation
    Amazing thoughts dada
    Keep it up♥️♥️♥️

    ReplyDelete

Post a Comment